माझी खवय्येगिरी
Tuesday, January 24, 2012
बिपीन चा वडा पाव!
Friday, January 6, 2012
काकडी-पुदिना-ताक
कडक उन्हाळ्यात पाचक असं आणि एक refreshing घरगुती 'drink' म्हणजे काकडी-पुदिना-ताक! आता नावाप्रमाणेच त्यात काय काय असणार आहे याची कल्पना येते.. काकडी किसून ताकात घालायची आणि पुदिना पण बारीक चिरून त्यात जिरपूड, मीठ घालायचं , आणि हे सगळं mixer मधून काढायचं.. फ्रीज मध्ये ठेवून थंडगार करायचं आणि मगच घ्यायचं.. तिन्हीचा एकत्र flavour फार सुंदर येतो. माझं खूप आवडीचं पेय आहे हे. त्यामुळे उन्हाळा आला की पेप्सी, कोक पेक्षा ह्या चविष्ट काकडी-पुदिना-ताकाचीच आठवण जास्त येते.
Wednesday, December 28, 2011
सोलापुरी शेंगदाणा चटणी
सोलापूर ची चटणी ही specialty असल्यामुळे ह्या चटणीचा व्यवसाय करणारे व्यावसायिक पण ढिगाने आहेत; त्यांच्या कारखान्यात कुटण्याचं काम अर्थातच माणूस नव्हे तर यंत्र करतं; पण तिथेही खल लाकडीच असतात.. त्यामुळे चव घेतल्यावर सामग्री तीच नेहमीची असली तरी चव अशी काही खास असते की वाटीभर चटणी मी अशीच नुसती खाऊन फस्त करू शकते; चिवडा खाल्ल्यासारखी...
नसले यांची सोलापुरी चटणी प्रसिद्ध आहे, पण सोलापूर मध्ये अश्या अनेक घरगुती कंपन्या आहेत. नसलेंची चटणी पुण्यात देसाई बंधुंकडेही मिळते. त्यामुळे फक्त त्यासाठी all the way सोलापूर ला जायची गरज नाही. पण अर्थात, सोलापूरची ज्वारीची भाकरी(ज्वारी हे मुख्य पिक असल्यामुळे सोलापुरी ज्वारीलाही खास चव असते) आणि त्या बरोबर शेंगदाण्याची चटणी, बेसनाचे पिठले, वांग्याची भाजी अन दही, या झकास मेनू चा आस्वाद घ्यायचा असल्यास सोलापूरला जाणेच उत्तम!
- अदिती
Wednesday, December 21, 2011
Supreme Corner, JM Road Pune - पावभाजी
पुणेरी बाणा, वेळेच्या अटी, बोलण्याची पुणेरी पद्धत हे सगळं सहन किंवा दुर्लक्ष करूनसुद्धा जाण्याचं ठिकाण म्हणजे Supreme corner. आणि ते सुद्धा खास पावभाजी साठीच. तिथे पावभाजी, पुलाव आणि पिझ्झा असे ३ च पदार्थ मिळतात. त्यांचा गाळा ते ८ ते ११ याच वेळात चालू ठेवतात. म्हणजे, गुरुवारी आणि रविवारीच साबुदाणा खिचडी मिळेल अश्या अटी आपण पाहतो ना, तश्याच प्रकारचं हे साधारण..
चविष्ट बटरयुक्त पावभाजी, गरमा गरम, मऊ असे अमूल butter लावलेले मोहक पाव! पावावरचा तप्कीरी रंग butter मुळे इतका चमकत असतो की ते नुसतेच खाण्याचा मोह आवरतच नाही. पहिली पाव जोडी तर मी अश्शीच नुसती खाऊन अनेकदा संपवली आहे.
बसल्या बसल्या लगेच वेटर ने येऊन order घेतली आणि ५व्या मिनटाला पावभाजी हजर. पहिला घास घेताच माझ्या एका मित्राला एवढ्या Waiting चं सार्थक झाल्यासारखं वाटलं. कारण तो पहिल्यांदाच इथे आला होता आणि एका पाव भाजी साठी ५०मि. Waiting त्याने जराश्या नाराजीनेच सहन केलं होतं. यावेळीही तीच जिभेवर रेंगाळणारी चव, पावभाजी पावभाजीच्या डीश मध्ये न देता डीश वर बटर पेपर ठेवून त्यावर भाजी वाढण्याची तीच खास पद्धत किंबहुना प्लेट्स पटापट विसळून पुढच्या lot साठी तयार ठेवण्यासाठी केलेली युक्ती, असं मी म्हणीन.
३ पावभाजी नंतर तवा पुलाव असा आडवा हात मारून २०व्या मिनटाला आम्ही Supreme च्या बाहेर! आत्ता कळलं, आमचा ५१वा नंबर लवकर कसा लागला. आणि अर्थातच, जर ८ च्या आधी ५०-५० Waiting नंबर होत असेल तर सतत fast service तीही quality सहित देणेच फायद्याचे आहे.. त्यांच्याही आणि आमच्याही, नाही का! ;)
चविष्ट बटरयुक्त पावभाजी, गरमा गरम, मऊ असे अमूल butter लावलेले मोहक पाव! पावावरचा तप्कीरी रंग butter मुळे इतका चमकत असतो की ते नुसतेच खाण्याचा मोह आवरतच नाही. पहिली पाव जोडी तर मी अश्शीच नुसती खाऊन अनेकदा संपवली आहे.
लोक संध्याकाळी ७ पासून रांग लावतात असं ऐकलं तेव्हा उडवून लावलं मी. पावभाजी खायला संध्याकाळी ७ पासून कोणी रांगा लावतं का!! पण मी स्वत: जेव्हा हा अनुभव घेतला तेव्हा मी चाट पडले. आधी ८.३०, ९ नंतर waiting वर राहून मी भरपूरदा इथे पाव भाजी खाल्ली आहे. पण संध्याकाळी ७ वाजता तिथे जाण्याचा योग आला नव्हता, तो २ मित्रांना भेटण्याच्या निमित्ताने आला. ७.१५ पासूनच १ जोडपे तिथल्या टेबल वर बसून होते. तिथे आतला गाळा बंद असला तरी खुर्ची वर बसून टेबल block करण्याची मुभा असते. आम्ही त्या जोडप्याला वेड्यात काढून बाजूच्याच हॉटेल मध्ये चहा घ्यायला बसलो, आत्तापासून supreme ला line कशाला लावत बसायची म्हणून. आणि साधारण ७.५० ला वगैरे तिथे पुन्हा गेलो तर झुंडच्या झुंड लोकांची! आम्ही अवाक झालो. झक मारत तिथे दाराशी उभे असलेल्या 'manager' कडे आमचा 'नंबर' लावला. Waiting number किती असेल तर ५१! म्हणजे आमच्या आधी ५० जणांनी number लावला होता ८ वाजायच्या आतच!! थोड्या वेळासाठी लांब गेल्यामुळे ही ५१ ची देणगी आम्हाला मिळाली होती.. हो-नाही करत आम्ही ठरवलं अर्धा तास थांबण्याचं आणि आमचा नंबर साधारण ४५-५० मी. मध्ये लागला. त्या मानाने पटापटच!
बसल्या बसल्या लगेच वेटर ने येऊन order घेतली आणि ५व्या मिनटाला पावभाजी हजर. पहिला घास घेताच माझ्या एका मित्राला एवढ्या Waiting चं सार्थक झाल्यासारखं वाटलं. कारण तो पहिल्यांदाच इथे आला होता आणि एका पाव भाजी साठी ५०मि. Waiting त्याने जराश्या नाराजीनेच सहन केलं होतं. यावेळीही तीच जिभेवर रेंगाळणारी चव, पावभाजी पावभाजीच्या डीश मध्ये न देता डीश वर बटर पेपर ठेवून त्यावर भाजी वाढण्याची तीच खास पद्धत किंबहुना प्लेट्स पटापट विसळून पुढच्या lot साठी तयार ठेवण्यासाठी केलेली युक्ती, असं मी म्हणीन.
३ पावभाजी नंतर तवा पुलाव असा आडवा हात मारून २०व्या मिनटाला आम्ही Supreme च्या बाहेर! आत्ता कळलं, आमचा ५१वा नंबर लवकर कसा लागला. आणि अर्थातच, जर ८ च्या आधी ५०-५० Waiting नंबर होत असेल तर सतत fast service तीही quality सहित देणेच फायद्याचे आहे.. त्यांच्याही आणि आमच्याही, नाही का! ;)गीता रिफ्रेशमेंटस - पार्ला इस्ट
पार्ला इस्ट मधल्या गजबजलेल्या मार्केट मध्ये मोक्याच्या ठिकाणी वसलेलं गीता रिफ्रेशमेंटस हे ठिकाण म्हणजे खरंच refresh होण्याचं हमखास ठिकाण आहे. पार्ला मार्केट मध्ये shopping करून करून 'दमलेल्या' लोकांसाठी गीता म्हणजे पर्वणीच! फक्कड चहा आणि चविष्ट पदार्थ हा गीताचा हातखंडा. मुळात शेट्टीचं असलेलं हे हॉटेल उत्कृष्ट दाक्षिणात्य पदार्थ देण्यात तरबेज असणार यात शंका नाही. इथला डोसा, इडली आणि खास करून रसम वडा अप्रतिम असतो. तशी रसम बंगलोर मध्ये असताना सुद्धा कधी मला मिळाली नाही.
इथे sweet corn च्या पदार्थांची एक खास वेगळी लिस्ट आहे. आणि त्यांच्या मते हे सगळे पदार्थ विशेष आहेत. किंवा आजच्या भाषेत ती त्यांची signature dish आहे. corn भुर्जी हा पदार्थ पण मसालेदार आणि चवदार आहे, पण पोळी किंवा पराठ्या बरोबरच खायला हवा. एकदा corn grill sandwich मागवले पण तेव्हा ते उपलब्ध नव्हते. त्यामुळे ते पदार्थ अजून खायचे राहिले आहेत. (जाताना counter वर corn sandwich अनुपलब्धी बद्दल प्रेमळ नाराजी व्यक्त वरूनच बाहेर पडले, हे सांगायला नकोच.)गीता ची खास दाक्षिणात्य style ची फिल्टर कॉफी आणि फक्कड आल्याचा चहा ही २ पेयं मात्र एकदम खास आहेत. १० रु. च्या मानाने चहाचा कप तसा लहान असतो :P त्यामुळे २ चहा घेतलेच जातात. पण तरी ते १० रु. worth आहेत. म्हणूनच पार्ल्यात गेलोय आणि गीताचा चहा घेतला नाही असे होतच नाही. एक वेळ shopping मनासारखं झालं नाही तरी चालेल, पण गीताच्या चहा साठी जमेल तेव्हा पार्ल्यात मी आवर्जून चक्कर टाकतेच हे सांगणे न लगे! :)
- अदिती
Subscribe to:
Comments (Atom)
