Tuesday, January 24, 2012

बिपीन चा वडा पाव!

कॉलेज मधलं आमचा एकंच काय ते हक्काचं कॅन्टीन म्हणजे बिपीन. गरवारे शाळेच्या बाजूला एका छोट्या टपरी  वजा दुकानात थाटलेलं बिपीन snacks. ३.५ रु. वडा पाव आणि २.५ रु. चहा, असा ६ रु. मध्ये आमचा breakfast  व्हायचा. पोहे, उप्पीट ५ रु, साबुदाणा खिचडी ७रु. (ही महाग वाटायची :D), पाव Pattice(७रु.), खिचडी काकडी(१२रु.). त्यांच्या वड्याचं सारण एकदम खास, चविष्ट असायचं. पावला चिंचेची चटणी आणि वडा पाव बरोबर मिरच्या. या काळाला आता वर्षं लोटली. पण अजूनही जेव्हा केव्हा मी बिपीन ला चक्कर मारते, वडा पाव घेतल्याशिवाय राहत नाही. आता वडापाव १० रु. चा झालाय.. पण अजूनही तस्साच वडा, तीच चव. कणभरही फरक नाही ;) आता वडा पाव बरोबर खोबरं-लसणाची चटणी पण देतात. आणि एक या वड्याचं किंवा या वडेवाल्यांचं वैशिष्ट्य म्हणजे कढईतून  काढलेले गरम गरम वडे direct पावाच्या आत आणि तिथून direct आपल्या हातात. सो तव्यावरची गरम पोळी कायम नशिबात नसली, तरी कढईतले गरमागरम वडे मात्र इथे नक्कीच खायला मिळतील. ;) 

4 comments:

  1. आता १० रुपये झाला आहे गं !!

    ReplyDelete
    Replies
    1. परवाच आम्ही खाल्ला पण total १०२ रु चं बिल केलं, त्यामुळे वडा पाव च्या किमतीकडे एवढं लक्ष दिलं नाही. पण बरोबर असलेल्या मित्राने मला त्याची ६ रु. किंमत सांगितली. असो. तुझ्यावर विश्वास ठेवून वर एडीट करते. धन्यवाद.

      Delete
  2. Nice..There is one more in camp near some garden..dont know the exact location, but used to have it there quite often..pretty famous..will let you know wen i know the name for sure..

    ReplyDelete
  3. कौस्तुभ,

    जे जे गार्डन.

    ReplyDelete