Tuesday, January 24, 2012

बिपीन चा वडा पाव!

कॉलेज मधलं आमचा एकंच काय ते हक्काचं कॅन्टीन म्हणजे बिपीन. गरवारे शाळेच्या बाजूला एका छोट्या टपरी  वजा दुकानात थाटलेलं बिपीन snacks. ३.५ रु. वडा पाव आणि २.५ रु. चहा, असा ६ रु. मध्ये आमचा breakfast  व्हायचा. पोहे, उप्पीट ५ रु, साबुदाणा खिचडी ७रु. (ही महाग वाटायची :D), पाव Pattice(७रु.), खिचडी काकडी(१२रु.). त्यांच्या वड्याचं सारण एकदम खास, चविष्ट असायचं. पावला चिंचेची चटणी आणि वडा पाव बरोबर मिरच्या. या काळाला आता वर्षं लोटली. पण अजूनही जेव्हा केव्हा मी बिपीन ला चक्कर मारते, वडा पाव घेतल्याशिवाय राहत नाही. आता वडापाव १० रु. चा झालाय.. पण अजूनही तस्साच वडा, तीच चव. कणभरही फरक नाही ;) आता वडा पाव बरोबर खोबरं-लसणाची चटणी पण देतात. आणि एक या वड्याचं किंवा या वडेवाल्यांचं वैशिष्ट्य म्हणजे कढईतून  काढलेले गरम गरम वडे direct पावाच्या आत आणि तिथून direct आपल्या हातात. सो तव्यावरची गरम पोळी कायम नशिबात नसली, तरी कढईतले गरमागरम वडे मात्र इथे नक्कीच खायला मिळतील. ;) 

Friday, January 6, 2012

काकडी-पुदिना-ताक

कडक उन्हाळ्यात पाचक असं आणि एक refreshing घरगुती 'drink' म्हणजे काकडी-पुदिना-ताक! आता नावाप्रमाणेच त्यात काय काय असणार आहे याची कल्पना येते.. काकडी किसून ताकात घालायची आणि पुदिना पण बारीक चिरून त्यात जिरपूड, मीठ घालायचं , आणि हे सगळं mixer मधून काढायचं.. फ्रीज मध्ये ठेवून थंडगार करायचं आणि मगच घ्यायचं..  तिन्हीचा एकत्र flavour फार सुंदर येतो. माझं खूप आवडीचं पेय आहे हे. त्यामुळे उन्हाळा आला की पेप्सी, कोक पेक्षा ह्या चविष्ट काकडी-पुदिना-ताकाचीच आठवण जास्त येते.