Wednesday, December 21, 2011

Supreme Corner, JM Road Pune - पावभाजी

पुणेरी बाणा, वेळेच्या अटी, बोलण्याची पुणेरी पद्धत हे सगळं सहन किंवा दुर्लक्ष करूनसुद्धा जाण्याचं ठिकाण म्हणजे Supreme corner. आणि ते सुद्धा खास पावभाजी साठीच. तिथे पावभाजी, पुलाव आणि पिझ्झा असे ३ च पदार्थ मिळतात. त्यांचा गाळा ते ८ ते ११ याच वेळात चालू ठेवतात. म्हणजे, गुरुवारी आणि रविवारीच साबुदाणा खिचडी मिळेल अश्या अटी आपण पाहतो ना, तश्याच प्रकारचं हे साधारण..

चविष्ट बटरयुक्त पावभाजी, गरमा गरम, मऊ असे अमूल butter लावलेले मोहक पाव! पावावरचा तप्कीरी रंग butter मुळे इतका चमकत असतो की ते नुसतेच खाण्याचा मोह आवरतच नाही. पहिली पाव जोडी तर मी अश्शीच नुसती खाऊन अनेकदा संपवली आहे.

लोक संध्याकाळी ७ पासून रांग लावतात असं ऐकलं तेव्हा उडवून लावलं मी. पावभाजी खायला  संध्याकाळी ७ पासून कोणी रांगा लावतं का!! पण मी स्वत: जेव्हा हा अनुभव घेतला तेव्हा मी चाट पडले. आधी ८.३०, ९ नंतर waiting वर राहून  मी भरपूरदा इथे पाव भाजी खाल्ली आहे. पण संध्याकाळी ७ वाजता तिथे जाण्याचा योग आला नव्हता, तो २ मित्रांना भेटण्याच्या निमित्ताने आला. ७.१५ पासूनच १ जोडपे तिथल्या टेबल वर बसून होते. तिथे आतला गाळा बंद असला तरी खुर्ची वर बसून टेबल block करण्याची मुभा असते. आम्ही त्या जोडप्याला वेड्यात काढून बाजूच्याच हॉटेल मध्ये चहा घ्यायला बसलो, आत्तापासून supreme ला line कशाला लावत बसायची म्हणून. आणि साधारण ७.५० ला वगैरे तिथे पुन्हा गेलो तर झुंडच्या झुंड लोकांची! आम्ही अवाक झालो. झक मारत तिथे दाराशी उभे असलेल्या 'manager' कडे आमचा 'नंबर' लावला. Waiting  number किती असेल तर ५१! म्हणजे आमच्या आधी ५० जणांनी number लावला होता ८ वाजायच्या आतच!! थोड्या वेळासाठी लांब गेल्यामुळे ही  ५१ ची देणगी आम्हाला मिळाली होती.. हो-नाही करत आम्ही ठरवलं अर्धा तास थांबण्याचं आणि आमचा नंबर साधारण ४५-५० मी. मध्ये लागला. त्या मानाने पटापटच!

बसल्या बसल्या लगेच वेटर ने येऊन order घेतली आणि ५व्या मिनटाला पावभाजी हजर. पहिला घास घेताच माझ्या एका मित्राला एवढ्या Waiting चं सार्थक झाल्यासारखं वाटलं. कारण तो पहिल्यांदाच इथे आला होता आणि एका पाव भाजी साठी ५०मि. Waiting त्याने जराश्या नाराजीनेच सहन केलं होतं. यावेळीही तीच जिभेवर रेंगाळणारी चव, पावभाजी पावभाजीच्या डीश मध्ये न देता डीश वर बटर पेपर ठेवून त्यावर भाजी वाढण्याची तीच खास पद्धत किंबहुना प्लेट्स पटापट विसळून पुढच्या lot साठी तयार ठेवण्यासाठी केलेली युक्ती, असं मी म्हणीन.

३ पावभाजी नंतर तवा पुलाव असा आडवा हात मारून २०व्या मिनटाला आम्ही Supreme च्या बाहेर! आत्ता कळलं, आमचा ५१वा नंबर लवकर कसा लागला. आणि अर्थातच, जर ८ च्या आधी ५०-५० Waiting नंबर होत असेल तर सतत fast service तीही quality सहित देणेच फायद्याचे आहे.. त्यांच्याही आणि आमच्याही, नाही का! ;)No comments:

Post a Comment