Wednesday, December 21, 2011

गीता रिफ्रेशमेंटस - पार्ला इस्ट

पार्ला इस्ट मधल्या गजबजलेल्या मार्केट मध्ये मोक्याच्या ठिकाणी वसलेलं गीता रिफ्रेशमेंटस हे ठिकाण म्हणजे खरंच refresh होण्याचं हमखास ठिकाण आहे.  पार्ला मार्केट मध्ये shopping करून करून 'दमलेल्या' लोकांसाठी गीता म्हणजे पर्वणीच! फक्कड चहा आणि चविष्ट पदार्थ हा गीताचा हातखंडा. मुळात शेट्टीचं असलेलं हे हॉटेल उत्कृष्ट दाक्षिणात्य पदार्थ देण्यात तरबेज असणार यात शंका नाही. इथला डोसा, इडली आणि खास करून रसम वडा अप्रतिम असतो. तशी रसम बंगलोर मध्ये असताना सुद्धा कधी  मला मिळाली नाही.

 इथे sweet corn च्या पदार्थांची एक खास वेगळी लिस्ट आहे. आणि त्यांच्या मते हे सगळे पदार्थ विशेष आहेत. किंवा आजच्या भाषेत ती त्यांची signature dish आहे. corn भुर्जी हा पदार्थ पण मसालेदार आणि चवदार आहे, पण पोळी किंवा पराठ्या बरोबरच खायला हवा. एकदा corn grill sandwich मागवले पण तेव्हा ते उपलब्ध नव्हते. त्यामुळे ते पदार्थ अजून खायचे राहिले आहेत. (जाताना counter वर corn sandwich अनुपलब्धी बद्दल प्रेमळ नाराजी व्यक्त वरूनच बाहेर पडले, हे सांगायला नकोच.)


गीता ची खास दाक्षिणात्य style ची फिल्टर कॉफी आणि फक्कड आल्याचा चहा ही २ पेयं मात्र एकदम खास आहेत. १० रु. च्या मानाने चहाचा कप तसा लहान असतो :P त्यामुळे २ चहा घेतलेच जातात. पण तरी ते १० रु. worth आहेत. म्हणूनच पार्ल्यात गेलोय आणि गीताचा चहा घेतला नाही असे होतच नाही. एक वेळ shopping  मनासारखं झालं नाही तरी चालेल, पण गीताच्या चहा साठी जमेल तेव्हा पार्ल्यात मी आवर्जून चक्कर टाकतेच हे सांगणे न लगे! :)

- अदिती 

No comments:

Post a Comment